उम्मत फाउंडेशनकडून उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
रायगड, 24 जून (हिं.स.) : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेरळ येथील उम्मत फाउंडेशनच्या वतीने परिसरातील चार उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्
Ummat Foundation takes the initiative for the education of needy students.


रायगड, 24 जून (हिं.स.) : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेरळ येथील उम्मत फाउंडेशनच्या वतीने परिसरातील चार उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत आर.झेड.पी. उर्दू स्कूल, नेरळ, आर.झेड.पी. उर्दू School, मामदापूर, आर.झेड.पी. उर्दू स्कूल, दामत तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल, नेरळ येथील विद्यार्थ्यांना वह्या, ड्रॉईंग बुक, रजिस्टर, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आणि स्केल यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे भाव पाहायला मिळाले. उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष अल्काश मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

यावेळी मुजम्मिल मनियार, अली खान, परवेझ पटेल, अफ्फान नजे, अफजल अन्सारी, तजम्मुल मद्हू, जकवान मनियार, पापा मुल्ला, जुनैद भाई, मंजूर मुल्ला आणि अलफैझ खान यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande