मीटर न बसवताच वडगावच्या ग्राहकांना हजारो रुपयांची बिले; महिलांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
लातूर, 24 जून (हिं.स.)। -मीटर न बसवताच हजारो रुपयांची अव्वाच्या सव्वा बिले देऊन महावितरणकडून गरिबांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार निलंगा तालुक्यातील वडगाव येथे उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या वडगाव येथील महिला व
महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा


लातूर, 24 जून (हिं.स.)।

-मीटर न बसवताच हजारो रुपयांची अव्वाच्या सव्वा बिले देऊन महावितरणकडून गरिबांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार निलंगा तालुक्यातील वडगाव येथे उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या वडगाव येथील महिला व नागरिकांनी आज (२४ जून) महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही गोरगरीब, रोजमजुरी करून जगणारे लोक आहोत, आम्हाला महावितरणची ही लूट परवडणारी नाही. आम्हाला स्मार्ट मीटर नको, साधेच मीटर बसवा, अशी आर्त साद घालत नागरिकांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande