कल्याण-बदलापूर स्थानकांदरम्यान २७-२८ जूनच्या रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई, 24 जून (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे कल्याण - बदलापूर स्थानकांदरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी, ५७/१८ ते ५७/२२ या किलोमीटर दरम्यान असलेल्या पादचारी पुलाच्या आग्नेय दिशेला (कर्जत टोकाकडे ) ''एन'' ट
कल्याण-बदलापूर स्थानकांदरम्यान २७-२८ जूनच्या रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


मुंबई, 24 जून (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे कल्याण - बदलापूर स्थानकांदरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी, ५७/१८ ते ५७/२२ या किलोमीटर दरम्यान असलेल्या पादचारी पुलाच्या आग्नेय दिशेला (कर्जत टोकाकडे ) 'एन' टाइपचा पूलाला आधार देणारा सांगाडा (ट्रस) रोड क्रेनच्या साहाय्याने काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक २७/२८.०६.२०२६ (शनिवार-रविवार रात्री) घेतला जाईल.

ब्लॉकची तारीख, कालावधी आणि विभाग: -

दिनांक २७/२८.०६.२०२६ (शनिवार-रविवारची रात्र) ०१.२० ते ०३.५० (दिनांक २८.०६.२०२६ रोजी) या वेळेत, कल्याण आणि वांगणी (दोन्ही स्थानके वगळून) दरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' दक्षिण-पूर्व मार्गावर.

ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

ब्लॉक कालावधीत उपनगरीय रेल्वे गाड्यांचे कामकाज:

ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

खालील उपनगरीय रेल्वे रद्द राहतील

• BL 61 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बदलापूर लोकल: दिनांक २७.०६.२०२६ रोजी २३.५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी.

• A1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अंबरनाथ लोकल: दिनांक २८.०६.२०२६ रोजी ००.०२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी.

• TBL4 बदलापूर - ठाणे लोकल: दिनांक २७.०६.२०२६ रोजी २३.०४ वाजता बदलापूर येथून सुटणारी.

• A2 अंबरनाथ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल: दिनांक २८.०६.२०२६ रोजी ०३.४३ वाजता अंबरनाथ येथून सुटणारी.

उपनगरीय गाड्यांचा प्रवास मध्येच शॉर्ट टर्मिनेट / शॉर्ट ओरीजनेट करणे

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१२ वाजता सुटणारी S1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

• कर्जत येथून ०२:३० वाजता सुटणारी S2 कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे येथून ०४:०० वाजता सुटेल.

ब्लॉकपूर्वीची आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल

• ब्लॉकपूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत दिशेची शेवटची लोकल: दिनांक २७.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३:३० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कर्जत लोकल.

• ब्लॉकपूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी शेवटची लोकल: दिनांक २७.०६.२०२६ रोजी बदलापूर येथून २३:२९ वाजता सुटणारी बदलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

• ब्लॉकनंतरची पहिली लोकल: दिनांक २८.०६.२०२६ रोजी ठाणे येथून ०५:०० वाजता सुटणारी ठाणे - कर्जत लोकल.

• ब्लॉकनंतरची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल: दिनांक २८.०६.२०२६ रोजी कर्जत येथून ०३:३५ वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आणि अंबरनाथ येथून ०४:०८ वाजता सुटणारी अंबरनाथ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

अप दिशेच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग बदलणे

खालील गाड्या कर्जत - पनवेल - दिवा मार्गावरून वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्य स्थानावर १० ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.

• गाडी क्र. 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस दिनांक २८.०६.२०२६ रोजी ०४:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणारी.

• गाडी क्र. 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २८.०६.२०२६ रोजी ०४:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणारी.

• गाडी क्र. 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २८.०६.२०२६ रोजी ०४:५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणारी.

• गाडी क्र. 11140 होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २८.०६.२०२६ रोजी ०५:१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणारी.

कल्याण येथे नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना, कल्याण स्थानकावर चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथेही थांबा देण्यात येईल.

उशिरा चालविण्यात येणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या किंवा हॉलिडे स्पेशल गाड्यांना परिचालनाच्या आवश्यकतेनुसार वळवण्यात येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande