राज्याच्या कृषी पुरस्कारात बीडची छाप
बीड, 25 जून (हिं.स.)। राज्य शासनाने सन २०२४ साठी विविध कृषी पुरस्कार जाहीर केले असून, बीड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी विस्तार
राज्याच्या कृषी पुरस्कारात बीडची छाप


बीड, 25 जून (हिं.स.)।

राज्य शासनाने सन २०२४ साठी विविध कृषी पुरस्कार जाहीर केले असून, बीड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने विविध पुरस्कारांसाठी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

'वसंतराव नाईक कृषिभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कार'

पुरस्कारासाठी गेवराई तालुक्यातील बोरखेड (वडवाडी) येथील अभिमान शहूराव अवचर यांची निवड झाली आहे. तर 'उद्यानपंडित पुरस्कार' हा सन्मान गेवराई येथील दाभाडी गल्ली येथील रवी रामनाथ दाभाडे यांना जाहीर झाला आहे.

फलोत्पादन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. याशिवाय 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' (सर्वसाधारण गट) परळी तालुक्यातील मलनाथपूर येथील

शेतकरी, अधिकाऱ्यांचा समावेश, जिल्हाभरातून होतेय कौतूक

बाबूराव माणिकराव सलगर यांना जाहीर करण्यात आला आहे. कृषी उत्पादनवाढ, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

कृषी विभागातील उत्कृष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी' अंबाजोगाई तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी पंडित किशनराव काकडे यांची निवड झाली आहे.

कृषी विस्तार आणि शेतकऱ्यांना दिलेल्या प्रभावी मार्गदर्शनाची ही दखल मानली जात आहे. राज्य शासनाच्या या पुरस्कार घोषणेमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक व शाश्वत शेतीसाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande