आळंदी रस्त्यापासून कात्रजपर्यंत बीआरटी संपणार? पुण्यात मोठा वाहतूक बदल
पुणे, 25 जून (हिं.स.)। आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आला असतानाच, शहरातील बीआरटी प्रणालीबाबत मोठा निर्ण
आळंदी रस्त्यापासून कात्रजपर्यंत बीआरटी संपणार? पुण्यात मोठा वाहतूक बदल


पुणे, 25 जून (हिं.स.)।

आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आला असतानाच, शहरातील बीआरटी प्रणालीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने पुण्यातील बीआरटी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.स्वारगेट–कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवण्यासही मंजुरी देण्यात आली असून, ही कार्यवाही पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बीआरटी प्रकल्पाची अंमलबजावणी काही वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती. सातारा रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कालांतराने सोलापूर रस्त्यावरील बहुतांश बीआरटी मार्ग काढून टाकण्यात आला, त्यानंतर नगर रस्त्यावरीलही मोठा भाग हटवण्यात आला आहे.स्थायी समितीच्या बैठकीत विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा बीआरटी मार्ग हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनानेही या निर्णयाला सकारात्मक अभिप्राय दिला आहे. बीआरटी हटवल्यास आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी होईल आणि खासगी वाहनांसाठी दोन अतिरिक्त लेन उपलब्ध होतील, असे प्रशासनाच्या अभिप्रायात नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande