नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
नंदुरबार, 25 जून (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ सर्व पात्र कामगारांनी घ्यावा, असे आवाहन सरकारी कामग
नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


नंदुरबार, 25 जून (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ सर्व पात्र कामगारांनी घ्यावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे.

मंडळामार्फत सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य आणि अर्थसहाय्य अशा विविध योजनांचा समावेश आहे. नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी 30 हजार रुपये तर एका मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि कौशल्य वृद्धीकरण योजनांचा लाभही उपलब्ध आहे.

शैक्षणिक योजनेंतर्गत कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी इयत्ता 1 ली ते 7 वी साठी दरवर्षी 2,500 रुपये आणि 8 वी ते 10 वी साठी 5,000 रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 50 टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000 रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाते. तसेच 11 वी व 12 वी शिक्षणासाठी दरवर्षी 10,000 रुपये सहाय्य मिळते. पदवी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीही विविध स्वरूपाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. एमएससीआयटीसारख्या संगणक शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीदेखील केली जाते.

अर्थसहाय्य योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत दिली जाते. अंत्यविधीसाठी 10,000 रुपये आणि विधवा किंवा विधुर व्यक्तीस 24,000 रुपये (5 वर्षांसाठी वार्षिक अर्ज आवश्यक) दिले जातात. घरबांधणी किंवा गृहकर्जावरील व्याजासाठी 6 लाख रुपयांपर्यंत सहाय्य किंवा 2 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे.

आरोग्य योजनेंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर पहिल्या मुलीच्या नावावर 18 वर्षांपर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाते. तसेच 75 टक्के अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

मंडळामार्फत भांडी संच, सुरक्षा संच आणि इतर वस्तूंचा लाभ पूर्णपणे विनामूल्य दिला जात असून या सेवांसाठी कोणत्याही दलाल किंवा एजंटला पैसे देऊ नयेत, असेही आवाहन श्रीमती सूर्यवंशी यांनी केले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande