परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला आग, जीवितहानी नाही
परभणी, 25 जून (हिं.स.)।जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीच्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, घटना घडण्याच्या सुमारास नियोजन सभागृहात बुथस्तरीय अधिकारी(बीएलओ)बैठरीसाठी जमले होते. मा
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला लागली आग


परभणी, 25 जून (हिं.स.)।जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीच्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, घटना घडण्याच्या सुमारास नियोजन सभागृहात बुथस्तरीय अधिकारी(बीएलओ)बैठरीसाठी जमले होते. मात्र नियोजन सभागृहाच्या स्टोअर रूमला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी तात्काळ सभागृहाबाहेर धाव घेतली. घटनेनंतर अग्निशमन दलास तात्काळ पाचारण करण्यात आले. आगीची ही घटना तात्काळ नियंत्रणात आली असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande