कोयता गँगला लातूर पोलिसांचा दणका; आरोपीची काढली धिंड
लातूर, 25 जून (हिं.स.)।लातूर शहरात कोयता गँगची वाढती दहशत लक्षात घेता पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. वासवडी येथील भाजी मार्केट परिसरात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत धिंड काढत चांगलाच
आरोपींची धिंड


लातूर, 25 जून (हिं.स.)।लातूर शहरात कोयता गँगची वाढती दहशत लक्षात घेता पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. वासवडी येथील भाजी मार्केट परिसरात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत धिंड काढत चांगलाच धडा शिकवला.

काही दिवसांपूर्वी वासवाडी परिसरात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबावर कोयत्याच्या धाकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून कोयता गँगशी संबंधित युवकाला पकडले. त्यानंतर परिसरात त्याची धिंड काढून गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.

या कारवाईमुळे वासवाडी आणि भाजी मार्केट परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, लातूर पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande