लोहगड किल्ल्यावर झालेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीचे निर्देश
मुंबई, 25 जून (हिं.स.) : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात नुकत्याच घडलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी आज विधानसभेत दिले. विधानसभ
लोहगड किल्ल्यावर झालेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीचे निर्देश


मुंबई, 25 जून (हिं.स.)

: पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात नुकत्याच घडलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी आज विधानसभेत दिले.

विधानसभेत सदस्य सुनील शेळके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या घटनेची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या प्रकरणाची माहिती देताना, लोहगड किल्ला परिसरात एका युवकाची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या झाल्याचा आरोप असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि संताप व्यक्त होत असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाचा सर्वंकष तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

यावर बोलताना तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande