
छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी निवड करून दिल्याबद्दल आमदार अर्जुन खोतकर यांनी आनंद व्यक्त केला आहे
ही जबाबदारी माझ्यावर सोपवून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. सभागृहाची परंपरा, नियम आणि लोकशाही मूल्ये जपत ही जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.
यावेळी माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, सहकारी आमदारांचे तसेच माझ्या जालना मतदारसंघातील जनतेचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनहितासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.
पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis