
छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)।
अंबादास दानवे महायुतीसोबत निवडणूक लढवत आहेत . छत्रपती संभाजी नगर जिल्हा बँक निवडणुक
यामुळे चर्चेत आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. बिगरशेती संस्था मतदारसंघातून दानवे उमेदवारी करत असून, त्यांच्या प्रवेशासाठी महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांनी माघार घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातील विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis