श्रीवर्धनमध्ये पावसामुळे 5 तास वीजपुरवठा खंडित
रायगड, 25 जून (हिं.स.) : श्रीवर्धन तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याची जुनी समस्या पुन्हा एकदा उघड झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना सुमारे पाच तास अंधारात राहावे लागले. वीज नस
MahaVitaran's sloppy operations? Shrivardhan in the dark for five hours.


रायगड, 25 जून (हिं.स.) : श्रीवर्धन तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याची जुनी समस्या पुन्हा एकदा उघड झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना सुमारे पाच तास अंधारात राहावे लागले.

वीज नसल्याने घरगुती कामकाज ठप्प झाले, तर व्यापारी वर्गालाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असून इंटरनेट व मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचा महावितरणचा दावा असला तरी, पहिल्याच जोरदार पावसात वीज खंडित होत असल्याने या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“पाऊस पडला की वीज जाणारच” ही परिस्थिती बदलण्याची गरज असून, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे. महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीला आळा घालावा, अन्यथा संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande