
जळगाव,, 25 जून (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इयत्ता ८ वी, कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारे आणि मुक्ताईनगर शहरात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास वर्ग, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांसह सर्व पात्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनीhttps://hmas.mahait.orgया संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात जमा करावी. शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इ.सर्व सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन गृहपाल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर