
नाशिक , 25 जून (हिं.स.)।
नाशिक महानगरपालिका अंतर्गत कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे बाह्य लसीकरण सत्र दर महिन्याच्या २ रा आणि ४ थ्या बुधवारी घेतले जाते. नियमित लसीकरण सत्र चालु असताना श्रावणी अनिल पाटील १६ वर्षाची मुलगी धनुर्वात आणि घटसर्प (Inj Td) प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. तिला १२ वाजून ४० मिनिटांनी लस देण्यात आली होती. त्याच्यानंतर ती घरी जात असताना तिला चक्कर आली आणि ती पडली. पडल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत गेली. त्याच्यानंतर मुलीच्या पालकांनी खाजगी हॉस्पिटल ला नेलं त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ला नेण्यात आलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.पोलीस पंचनामा करून पोस्टमार्टम झालेले आहे.या मुलीने धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधित लस घेतल्यानंतर मृत्यू झालेला आहे.
त्याची सखोल चौकशी सुरु आहे.
AEFI कमिटी बैठक २५ जुन २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे आहे.
संबंधित लसीचा नमुना सखोल उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवणार आहे. हि लस केंद्र सरकार मार्फत आपल्याकडे पोहोचते कारण पुर्ण भारतामध्ये ही लस वापरली जाते. आपल्याकडे जी लस आलेली होती त्यापैकी २४ व्हायल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामटवाडे येथे आलेल्या होत्या.त्यापैकी १२ व्हायल वापरण्यात आलेले आहेत. साधारण एका व्हायलमध्ये आपण १० जणांना लस देत असतो.या केंद्रामार्फत आत्तापर्यंत आपण १२० लसीकरण पूर्ण केलेले आहे. आम्ही सगळ्यांना फोन करून चौकशी केली आहे. त्याच्या पैकी कोणालाही त्रास झालेला नाही. ज्या व्हायल मधुन श्रावणी अनिल पाटील हिला इंजेक्शन दिले होते त्याच व्हायल मधुन एकुण ६ जणांना ही लस दिली होती. या मध्ये ४ गरोदर माता होत्या व एक १६ वर्षाची मुलगी होती एक १० वर्षाचा मुलगा होता. त्यातील उर्वरीत ५ जणांचा आमचा पाठपुरावा सुरु आहे. त्या ५ जणांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही.जो मृत्यु झाला आहे तो कोणत्या कारणामुळे झाला आहे त्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV