अमेरिका- इराण यांच्यातील अंतिम करारानंतरच अणु तपासणी शक्य- काझेम गरीबाबादी
तेहरान , 25 जून (हिं.स.)। इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने बुधवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए) प्रमुखांनी केलेले इराणच्या अणुस्थळांच्या तपासणीसंदर्भातील वक्तव्य फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारची तपासणी केवळ अमेरिका आणि
काझेम गरीबाबादी


तेहरान , 25 जून (हिं.स.)। इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने बुधवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए) प्रमुखांनी केलेले इराणच्या अणुस्थळांच्या तपासणीसंदर्भातील वक्तव्य फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारची तपासणी केवळ अमेरिका आणि इराण यांच्यात अंतिम करार झाल्यानंतरच शक्य होईल.

इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ही भूमिका मांडली. त्यांनी जपानमध्ये आयएईए चे महासंचालक राफाएल मारियानो ग्रोसी यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली.गरीबाबादी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “स्वित्झर्लंडमध्ये ग्रोसी यांनी भेटीची विनंती केली होती, मात्र त्यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. तसेच, हल्ला झालेल्या अणुस्थळांवर किंवा अणुसामग्रीपर्यंत त्यांना प्रवेश देण्याची कोणतीही योजना सध्या नाही.” ते पुढे म्हणाले, “या मुद्द्यांबाबतचा विचार आणि निर्णय केवळ अंतिम कराराच्या चौकटीतच घेतला जाईल. तसेच, दुसऱ्या पक्षाने सर्व निर्बंध आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय हटवण्यासाठी प्रत्यक्ष पावले उचलल्यानंतरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.”

यापूर्वी आयएईए प्रमुख ग्रोसी यांनी संकेत दिले होते की, संस्थेचे निरीक्षक इराणच्या अणु संवर्धन केंद्रांना भेट देतील. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध समाप्तीसाठी झालेल्या अंतरिम कराराचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे मानले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षण संस्थेचे प्रमुख ग्रोसी यांनी टोकियो येथे पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande