प्यू सर्वेक्षण : ट्रम्प यांच्या जागतिक लोकप्रियतेत मोठी घसरण
- तब्बल 76 टक्के लोकांचा नेतृत्वावर अविश्वास वॉशिंग्टन, 26 जून (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक लोकप्रियतेत लक्षणीय घट झाल्याचे प्यू रिसर्च सेंटरच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शु
जगभरात ट्रम्प यांची लोकप्रियता घटली; ७६% लोकांचा ट्रम्प यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही


- तब्बल 76 टक्के लोकांचा नेतृत्वावर अविश्वास

वॉशिंग्टन, 26 जून (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक लोकप्रियतेत लक्षणीय घट झाल्याचे प्यू रिसर्च सेंटरच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणांसह इराणविषयक भूमिका आणि इतर परराष्ट्र धोरणांमुळे त्यांच्या नेतृत्वावरील जागतिक विश्वास कमी झाल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जागतिक प्रश्न हाताळण्याबाबत ट्रम्प यांच्या नेतृत्वावर केवळ 23 टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला असून, तब्बल 76 टक्के सहभागीांनी त्यांच्यावर विश्वास नसल्याचे सांगितले. 24 देशांपैकी 16 देशांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली असून, एकाही देशात ती वाढलेली नाही.

8 फेब्रुवारी ते 13 मे या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 36 देशांतील 42,151 नागरिकांनी सहभाग घेतला होता.

भारतातील प्रतिसादात 39 टक्के सहभागीांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, तर 36 टक्के लोकांनी अविश्वास दर्शविला. गेल्या वर्षी हा आकडा 51 टक्के होता. याच सर्वेक्षणात 51 टक्के भारतीयांनी जागतिक घडामोडी हाताळण्याच्या बाबतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

इस्रायलमध्ये अमेरिकेबाबत सकारात्मक मत कायम असून 81 टक्के सहभागीांनी अमेरिकेविषयी अनुकूल भूमिका व्यक्त केली, तर 66 टक्के लोकांनी ट्रम्प जागतिक प्रश्नांवर योग्य निर्णय घेतील, असा विश्वास दर्शविला. मात्र फ्रान्स, जर्मनी, ग्रीस तसेच अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सर्वेक्षणानुसार, ट्रम्प प्रशासनाचे टॅरिफ धोरण हे सर्वाधिक अलोकप्रिय धोरणांपैकी एक ठरले आहे. या धोरणाला केवळ 18 टक्के सहभागीांचा पाठिंबा मिळाला. ब्रिटनमध्ये 27 टक्के, कॅनडात 17 टक्के, जपानमध्ये 15 टक्के, दक्षिण कोरियात 14 टक्के, मेक्सिकोमध्ये 11 टक्के आणि जर्मनीमध्ये केवळ 8 टक्के लोकांनी या धोरणाचे समर्थन केले. केनिया हा एकमेव देश ठरला, जिथे 55 टक्के सहभागीांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला पाठिंबा दर्शविला.

------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande