पिंपरी-चिंचवडकरांसाठी सुवर्णसंधी; मालमत्ता कर सवलतींचा लाभ घ्या 30 जूनपूर्वी
पुणे, 25 जून (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून मालमत्ता करावर देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. वेळेत कर भरणारे, ऑनलाइन कर भरणारे, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसे
PCMC


पुणे, 25 जून (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून मालमत्ता करावर देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. वेळेत कर भरणारे, ऑनलाइन कर भरणारे, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या संस्था आणि आस्थापनांना 5 ते 50 टक्क्यांपर्यंतच्या सवलती दिल्या जात असून, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत आहे.महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने नागरिकांना 30 जूनपूर्वी मालमत्ता कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी अद्याप कर भरलेला नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

30 जूनपूर्वी कर भरल्यास 5 टक्के सवलत मिळणार असून, ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 5 टक्के सवलतीचाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र मालमत्ताधारकांना दुहेरी आर्थिक लाभ मिळू शकतो.महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी 30 टक्के, दिव्यांग व्यक्तींसाठी 50 टक्के, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींसाठी विशेष करसवलतीची तरतूद करण्यात आली आहे.याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनाही प्रोत्साहनपर सवलती दिल्या जात आहेत. कंपोस्टिंग प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), झिरो वेस्ट उपक्रम आणि ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबविणाऱ्या संस्थांना 3 ते 15 टक्क्यांपर्यंत सवलती मिळू शकतात.महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मालमत्ता करातून मिळणारा निधी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, उद्याने आणि विविध नागरी विकासकामांसाठी वापरण्यात येतो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande