परभणी - पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा उत्साहात संपन्न
परभणी, 25 जून (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिका आणि पीएम-स्वनिधी 2020 योजनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वसमत रोड येथील बी. रघुनाथ सभागृहात लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास 400 हून अधिक लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विव
पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा उत्साहात संपन्न


परभणी, 25 जून (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिका आणि पीएम-स्वनिधी 2020 योजनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वसमत रोड येथील बी. रघुनाथ सभागृहात लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास 400 हून अधिक लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.

मेळाव्याचे उद्घाटन परभणी शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शंकर अजेगांवकर, श्रीपाद दैठणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अंकुलवार, शहर फेरीवाला समितीचे मोईन मौलवी, रामेश्वर आवरगंड, गौतम भराडे, सुमंगल उबाळे, नंदा मुळे, शेख साजिदभाई, जुबेरभाई आणि फरीदावी यांची उपस्थिती होती. या लोककल्याण मेळाव्यात नवीन कर्ज अर्ज स्वीकारणे, मंजूर कर्ज प्रकरणांचे वितरण, शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, क्रेडिट कार्ड लिंकिंग तसेच अमृत 2.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामुळे फेरीवाले, स्वयंरोजगार करणारे नागरिक आणि बचत गटांना मोठा लाभ झाला. यावेळी मान्यवरांनी पीएम-स्वनिधी योजनेमुळे लघु व्यावसायिक आणि पथविक्रेत्यांना आर्थिक बळ मिळत असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सहायक आयुक्त गजानन जाधव, शहर अभियान व्यवस्थापक एख्तियार पठाण, सुभाष मस्के, शेख मोहम्मद तसेच समुदाय संघटक नागसेन कांबळे, कृषीवर्ता जंगले, अर्जुन झटे, आशा सोनवणे आणि गोविंद कपाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande