धामणगाव मतदार संघांत जन कल्याण शिबिराला सुरुवात
अमरावती, 25 जून (हिं.स.)। विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय योजना, तक्रारी आणि समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आमदार प्रतापदादा अडसड यांच्या संकल्पनेत
धामणगाव मतदार संघांत जन कल्याण शिबिराला सुरुवात


अमरावती, 25 जून (हिं.स.)। विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय योजना, तक्रारी आणि समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आमदार प्रतापदादा अडसड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जन कल्याण योजनेतून शेकडो ग्रामस्थांच्या तक्रारी निकालात निघत आहे.

मंगरूळ दस्तगीर, लोणी टाकळी, आमला विश्वेश्वर शेदुरजना, खुर्द येथे पहिल्या टप्प्यात हे शिबिर घेण्यात आले.राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष तसेच शासकीय सेवांचा लाभ कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नागरिकांच्या प्रलंबित समस्या व तक्रारींची नोंद घेऊन त्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासकीय विभागांच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शासनाच्या योजना आणि सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी जनकल्याण शिबिराचे प्रमुख पाहुणे धामणगाव रेल्वे विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे, तसेच मंगरूळ दस्तगीरचे सरपंच सतीश हजारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मारोडकर, मंगेश मारोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवि भुतडा, बाबा ठाकूर, भाजपा तालुका अध्यक्ष बबलू खैरकार, प्रणय राजनकर, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा मालु रंगारी, माधुरी भोंगे, उमेश भुजाडणे, अरुण मडावी, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन पडोळे, राहुल चौधरी यांच्यासह अनेक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande