पुणे विद्यापीठाची जागतिक व राष्ट्रीय रँकिंगमध्ये घसरण; अधिसभा सदस्य आक्रमक
पुणे, 25 जून (हिं.स.)।पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकनातील दर्जा घसरल्याने विद्यापीठातील अधिसभा सदस्य आक्रमक झाले आहेत. घसरलेल्या रँकिंगच्या कारणांचा सखोल आढावा घेण्यासाठी विशेष अधिसभा बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. नुकत्य
University Pune SPUU


पुणे, 25 जून (हिं.स.)।पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकनातील दर्जा घसरल्याने विद्यापीठातील अधिसभा सदस्य आक्रमक झाले आहेत. घसरलेल्या रँकिंगच्या कारणांचा सखोल आढावा घेण्यासाठी विशेष अधिसभा बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे. सन २०२५ मध्ये ५६६ व्या क्रमांकावर असलेले विद्यापीठ यंदा ७९१ ते ८०० या गटात पोहोचले आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील एनआयआरएफ रँकिंगमध्येही विद्यापीठाच्या स्थानात घसरण नोंदवली गेली होती. या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यमान कुलगुरू वेळेवर निर्णय घेत नसल्याचा, महत्त्वाच्या विषयांवर ठाम भूमिका घेत नसल्याचा तसेच संशोधनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी विशेष अधिसभा घेऊन यावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. रँकिंगमधील घसरणीमुळे विद्यापीठाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande