पुणे - पावसाळ्यात मलेरिया रोखण्यासाठी ९५० आशा स्वयंसेविकांची घरोघरी तपासणी
पुणे, 25 जून (हिं.स.)।पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात मलेरिया नियंत्रणासाठी ९५० आशा स्वयंसेविका आणि २० मलेरिया वर्कर यांची टीम घरोघरी जाऊ
पुणे - पावसाळ्यात मलेरिया रोखण्यासाठी ९५० आशा स्वयंसेविकांची घरोघरी तपासणी


पुणे, 25 जून (हिं.स.)।पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात मलेरिया नियंत्रणासाठी ९५० आशा स्वयंसेविका आणि २० मलेरिया वर्कर यांची टीम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे.या मोहिमेत तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तातडीने तपासणी केली जाईल. संशयित रुग्णांचे रक्तनमुने लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवून त्यांची तपासणी केली जाणार आहे. रॅपिड फिवर टेस्टच्या माध्यमातून मलेरियाचे प्राथमिक निदान करण्यात येत असून, अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष तपासणीवर भर दिला जाणार आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आशा स्वयंसेविका व मलेरिया वर्कर घरभेटीदरम्यानतापग्रस्त रुग्णांची माहिती संकलित करतील. सर्व रक्तनमुने ७२ तासांच्या आत कसबा येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. अहवालात मलेरिया पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले जातील. तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या तापाच्या रुग्णांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, संशयित रुग्णांची २४ तासांच्या आत रक्ततपासणी करून मलेरिया संसर्गाची खात्री केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande