राज्यपालांच्या उपस्थितीत शनिवारी सिंबायोसिसचा पदवीदान सोहळा
पुणे, 25 जून (हिं.स.)। सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे शनिवार , दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे , पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या पद
राज्यपालांच्या उपस्थितीत शनिवारी सिंबायोसिसचा पदवीदान सोहळा


पुणे, 25 जून (हिं.स.)।

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे शनिवार , दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे , पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या पदवीदान समारंभास राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबईतील फ्रान्सचे कॉन्सुल जनरल श्री. पॅट्रिक लेव्हेरिनो हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस व कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र - कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व डॉ. रामकृष्णन रमण, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आदी इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande