
त्रंबकेश्वर, 25 जून (हिं.स.)।
सर्व दूर भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी विश्व कल्याण व्हावे या हेतूने त्रंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने येथे अनुष्ठान करण्यात आले. विद्वान पुरोहितांनी देवाची करुणा भाकत पर्जन्यवृष्टीसाठी मनोभावे प्रार्थना केली. येथील युवक पुरोहित मोठ्या संख्ये मंदिरात झालेल्या अनुष्ठानात सामील होते. पुरोहित संघाच्या या प्रार्थनेप्रसंगी देखील उपस्थितीत देवास प्रार्थना केली. कुंभमेळा आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी देखील साकडे घालण्यात आले आहे. नुकतेच हे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.
तसेच पंचदशनाम जुना आखाड्याचे श्रीमहंत हरिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत आज लघुरुद्र अनुष्ठान आयोजित करण्यात आले होते. पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे, जुना आखाड्याचे तिर्थपुरोहित त्रिविक्रम जोशी, ग्रामोपाध्ये दीक्षित, ग्रामजोशी मुळे बंधू शिखरे आदींसह असंख्य ब्रह्मवृदांनी या अनुष्ठाणामध्ये सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV