
नंदुरबार, 25 जून (हिं.स.) :दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या मातंग व तत्सम समाजातील नागरिकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत.
चालू आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला या योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील गरजू व होतकरू महिला-पुरुषांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण यांनी केले आहे.
महामंडळामार्फत मातंग समाजातील १२ पोटजातींतील नागरिकांना अर्थसहाय्य दिले जाते. यात मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा यांचा समावेश आहे.
या योजनांचा लाभ खालीलप्रमाणे मिळणार आहे:-
अनुदान कर्ज योजना: ₹१ लाख पर्यंत (उद्दिष्ट – ३० लाभार्थी)
बीजभांडवल कर्ज योजना: ₹१ ते ₹७ लाख (उद्दिष्ट – ३० लाभार्थी)
थेट कर्ज योजना: ₹१ लाख पर्यंत (उद्दिष्ट – २० लाभार्थी)
पात्रता अटींनुसार अर्जदार:-
नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी असावा
वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे
वरील १२ पोटजातींपैकी असावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असावे
यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा
संबंधित व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावा
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये:-
जात व उत्पन्न दाखला, आधार व ओळखपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, प्रकल्प अहवाल, व्यवसाय परवाना, सिबिल स्कोअर (५००), तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी 02564-210181 वर संपर्क करावा, असेही चव्हाण यांनी कळविले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर