रायगड - मोटार वाहन निरीक्षकांचा सहा महिन्यांचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर
रायगड, 25 जून (हिं.स.)। : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीतील शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्याद्वारे रोहा, मुरुड, अलिबाग, महाड, श्रीवर्धन
Six-month camp tour schedule for Motor Vehicle Inspectors announced.


रायगड, 25 जून (हिं.स.)। : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीतील शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्याद्वारे रोहा, मुरुड, अलिबाग, महाड, श्रीवर्धन आणि माणगाव तालुक्यांमध्ये विविध वाहनविषयक कामकाजांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

जुलै महिन्यात ७ जुलै रोजी रोहा, ८ जुलै रोजी मुरुड, १० व २४ जुलै रोजी अलिबाग, ६ व २० जुलै रोजी महाड, २१ जुलै रोजी श्रीवर्धन आणि २२ जुलै रोजी माणगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात ११ ऑगस्ट रोजी रोहा, १२ ऑगस्ट रोजी मुरुड, ७ व २५ ऑगस्ट रोजी अलिबाग, १० व १९ ऑगस्ट रोजी महाड, २० ऑगस्ट रोजी श्रीवर्धन आणि २१ ऑगस्ट रोजी माणगाव येथे शिबिरे होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ८ सप्टेंबर रोजी रोहा, ९ सप्टेंबर रोजी मुरुड, ११ व २८ सप्टेंबर रोजी अलिबाग, ७ व २१ सप्टेंबर रोजी महाड, २२ सप्टेंबर रोजी श्रीवर्धन आणि २३ सप्टेंबर रोजी माणगाव येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात १३ ऑक्टोबर रोजी रोहा, १४ ऑक्टोबर रोजी मुरुड, ९ व २३ ऑक्टोबर रोजी अलिबाग, १२ व २६ ऑक्टोबर रोजी महाड, २७ ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन आणि २८ ऑक्टोबर रोजी माणगाव येथे शिबिरे भरविण्यात येणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात १७ नोव्हेंबर रोजी रोहा, १८ नोव्हेंबर रोजी मुरुड, १३ व २३ नोव्हेंबर रोजी अलिबाग, १६ व २५ नोव्हेंबर रोजी महाड, २६ नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन आणि २७ नोव्हेंबर रोजी माणगाव येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तर डिसेंबर महिन्यात १५ डिसेंबर रोजी रोहा, १६ डिसेंबर रोजी मुरुड, ११ व २४ डिसेंबर रोजी अलिबाग, १४ व २८ डिसेंबर रोजी महाड, २९ डिसेंबर रोजी श्रीवर्धन आणि ३० डिसेंबर रोजी माणगाव येथे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

वाहनधारकांनी संबंधित तारखांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande