एसटी कामगारांच्या प्रश्नांकरता लवकरच एल्गार आंदोलन -प्रीतीश छाजेड
नाशिक, 25 जून (हिं.स.)। लोकनेते जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस च्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकरता आझाद मैदान येथे एल्गार आंदोलन पुकारले जाणार असून महाराष्ट्र शासन शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळावा हा
Soon-Elgar-protest-will-be-he


Vanchit Bahujan Aghadi's


नाशिक, 25 जून (हिं.स.)।

लोकनेते जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस च्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकरता आझाद मैदान येथे एल्गार आंदोलन पुकारले जाणार असून महाराष्ट्र शासन शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळावा हा मूळ उद्देश या आंदोलनाचा असणार आहे असे प्रतिपादन लोकनेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांनी केले

संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीत प्रसंगी ते बोलत होते. संघटनेच्या विस्तारीकरता व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकरता राज्यव्यापी दौरा करून त्यानंतर विभागीय मेळावे घेतल्यानंतर हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येईल अशी माहिती त्या प्रसंगी त्यांनी दिली. संघटनेचे राज्य कार्यकारणी बैठकी प्रसंगी प्रितेश छाजेड नाशिक येथे बोलत होते. जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज नाशिक येथे शर्मा मंगल कार्यालयाचे पार पडली. या संघटनेच्या वाडीकर्ता संपूर्ण राज्यामध्ये दौऱ्यादरम्यान एसटी इंटेक्स चे सर्व पदाधिकारी जोमाने काम करतील असे मत याप्रसंगी एसटी इंटक चे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव व महिला आघाडीचे अध्यक्ष अर्चना बोंबले यांनी या संघटना वाडी मध्ये महिलांचा मोठा सहभाग असेल महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता महिला आघाडी कटिबद्ध असेल असे आपल्या भाषणामध्ये त्यांनी मत व्यक्त केले.

या बैठकीमध्ये कोरोना काळातील कर्मचाऱ्यांचा वेतन फरक, निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवाराकरता सर्व बसेस मध्ये मोफत सेवा, एसटी कर्मचाऱ्यांकरता 50 लाखाचा विमा असे विविध ठराव पारित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande