छ. संभाजीनगर - नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, बार्शी
Q


छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, बार्शी (जि. सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिन तसेच नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली.

अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण आर. एम. शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, डॉ. संदीप तांबारे, डॉ. बालाजी जाधव, डॉ. कविता आंधारे, उपस्थित होते.

'नशामुक्त भारत अभियान मार्गदर्शक पुस्तिका' चे प्रकाशन करण्यात आले. तसेच एनडीपीएस कायदा, व्यसनमुक्तीसाठी संतुलित आहार, संत साहित्याचा व्यसनमुक्ती संदेश, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसची कार्यपद्धती, मानसिक प्रशिक्षण आणि व्यसनप्रतिबंधक जीवनकौशल्ये या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस राज्यभरातील २०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande