
परभणी, 25 जून (हिं.स.)।
शहरात झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अक्षदा मंगल कार्यालयाजवळील विष्णू जिनिंग परिसरात नवनाथ बोकन यांच्या राहत्या घरावर एक मोठे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नाही.घटनेची माहिती मिळताच दीपक कानोडे, अग्निशमन विभाग प्रमुख परभणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरावर पडलेले झाड सुरक्षितरीत्या हटविण्यात आले. त्यामुळे परिसरातील संभाव्य धोका टळला असून नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. या वेळी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis