बीडमध्ये अप्पर तहसील कार्यालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग
बीड, 25 जून (हिं.स.)। बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, बीड यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अन
बीडमध्ये अप्पर तहसील कार्यालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग


बीड, 25 जून (हिं.स.)।

बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, बीड यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेकनूरच्या प्रशासकीय मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बीड तालुक्यात नेकनूर येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या मुख्यालय व अधिकार क्षेत्राबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना

कार्यालयाचे मुख्यालय नेकनूरमध्ये

प्रारूप अधिसूचनेनुसार अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय मौजे नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरात प्रस्तावित करण्यात आले आहे. या मध्ये चार मंडळांचा समावेश नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात खालील चार महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे नेकनूर, येळंबघाट, मांजरसुंबा, चौसाळा, लिंबागणेश या मंडळांतील सर्व सज्जे तसेच गाव, वाड्या, तांडे आणि वस्त्या यांचा समावेश अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहे.

विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ती स्थगित ठेवण्यात आली होती. आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार नेकनूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande