मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
मनमाड, 25 जून, (हिं.स.)। मनमाड नगरपरिषद हद्दीतील ''आय.यु.डी.पी.'' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी ''सार्वजनिक गार्डन'' म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा केवळ पुत्रप्रेमापोटी नगराध्यक्ष व मुख्याधि
Vanchit Bahujan Aghadi's


मनमाड, 25 जून, (हिं.स.)। मनमाड नगरपरिषद हद्दीतील 'आय.यु.डी.पी.' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी 'सार्वजनिक गार्डन' म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा केवळ पुत्रप्रेमापोटी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत वैयक्तिक भाडेकराराने देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.याआधीही त्यांनी पालिकेला याबाबत रीतसर पत्रव्यवहार केला होता मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनमाड नगरपरिषदेने १० एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव क्र. १० नुसार, ही मोक्याची जागा खाजगी वापरासाठी भाडेकराराने देण्याचा घाट घातला आहे. केवळ आपल्या पुत्रप्रेमापोटी हे सर्व उठाठेव लोकनियुक्त नगराध्यक्ष करत असल्याचे वंचीत बहुजन आघाडीने सांगितले असुन ही जागा आरक्षित असताना व याठिकाणी केवळ 10 टक्के बांधकाम परवानगी असताना या जागेवर आता खाजगी 'टर्फ'चे कामही सुरू झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने याआधी १३ मे २०२६ रोजी निवेदनाद्वारे ही जागा सार्वजनिक वापरासाठीच ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर आज आंदोलन पुकारण्यात आले होते.यावेळी शहराध्यक्ष विलास अहिरे व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, आम्ही हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. जर प्रशासनाने हा बेकायदेशीर ठराव त्वरित रद्द केला नाही, तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे आणि जिल्हा सचिव कादिर शेख यांनी केले. तसेच जिल्हा नेते दिपक साळवे , संदीप पवार, निलेश निकम, सागर गाढे, राकेश पगारे, अमोल केदारे, अशफाक शहा, काकासाहेब भालेराव, खुशाल थोरात, सुनील बागुल.किरण पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande