व्हेनेझुएलानंतर जपानमध्ये ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप
टोकियो , 25 जून (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसून मोठी हानी झाल्यानंतर आता जपानच्या उत्तर भागातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. गुरुवारी जपानमध्ये रिश्टर स्केलवर ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने दिलेल
जपान भूकंप


टोकियो , 25 जून (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसून मोठी हानी झाल्यानंतर आता जपानच्या उत्तर भागातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. गुरुवारी जपानमध्ये रिश्टर स्केलवर ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे धक्के शेकडो किलोमीटर दूर असलेल्या राजधानी टोकियोपर्यंत जाणवले.या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच प्रशासनाकडून सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र होंशू बेटावरील इवाते प्रांताजवळ जमिनीखाली सुमारे ५० किलोमीटर खोलीवर होते. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानाची नोंद झालेली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून इवाते प्रांतातील शिंकान्सेन बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

शेजारच्या आओमोरी प्रांतातील हाशिकामी शहरात भूकंपाचे धक्के सर्वाधिक तीव्रतेने जाणवले. सार्वजनिक प्रसारकने दाखवलेल्या दृश्यांमध्ये हाचिनोहे शहरातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. तसेच वाहतूक सिग्नलही व्यवस्थित कार्यरत होते. जपानचे सरकारी प्रवक्ते मिनोरू किहारा यांनी सांगितले की, सध्या कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. प्रशासन नुकसानाचे मूल्यांकन करत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

होक्काइडो बेटावरील तोमारी अणुऊर्जा प्रकल्प परिसरात किरणोत्सर्गाची तपासणी करण्यात आली असून सर्व काही सामान्य असल्याचे आढळले आहे. आओमोरी प्रांतात भूकंपाची तीव्रता जपानच्या सात स्तरांच्या भूकंप मापन प्रणालीवर ‘अप्पर सिक्स’ इतकी नोंदवण्यात आली. या स्तरावर लोकांना आधाराशिवाय उभे राहणे कठीण होते आणि ते पडू शकतात. तसेच जड फर्निचर कोसळण्याची आणि खिडक्यांच्या काचा फुटण्याची शक्यता असते.

पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व मंत्रालये आणि सरकारी यंत्रणांना स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सामाजिक माध्यमांवरून नागरिकांना आवाहन केले की, पुढील काही काळात आणखी धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहावे.

जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो. हा देश प्रशांत महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ या भूकंपीयदृष्ट्या अतिसंवेदनशील पट्ट्यात स्थित आहे. येथे दरवर्षी शेकडो भूकंपाचे धक्के जाणवतात. जगातील एकूण भूकंपांपैकी सुमारे १८ टक्के भूकंप या प्रदेशात होतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande