मुख्यमंत्र्यांची सारथी कार्यालयास भेट
पुणे, 26 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे फड
Jfh


पुणे, 26 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांसह प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महेश पाटील यांनी सारथीच्या विविध उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande