
नाशिक, 27 जून (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये नाशिक शहरात तीन तर ग्रामीण भागात सहा ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यास गती मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्लॉक अध्यक्षांसह सह इतर विविध पदांवरती नियुक्ती बाकी होती. त्या नियुक्तीला आता सुरुवात करण्यात आली असून राज्यातील ब्लॉक अध्यक्ष यांची नियुक्ती शनिवारी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये देण्यात आलेल्या तीनही ब्लॉक अध्यक्ष हे तरुण असून नव्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यामध्ये नाशिक शहरासाठी तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक मध्ये शाहीर अत्तार, सिडको ब्लॉकसाठी भरत केशवराव पाटील, पंचवटीसाठी अभिजीत विजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक ग्रामीण साठी सहा ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कळवणला कारभारी गांगुर्डे, बागलाणला प्राध्यापक अनिल पाटील, मनमाडला नजीब शेख, मालेगाव ग्रामीण साठी शरद खैरनार, सुर करण्यासाठी तुकाराम जाधव, पेठ साठी गणपत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अधिकृत पत्रकाद्वारे या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV