वार्षिक पतपुरवठा, पीक कर्ज व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात केडीसीसी बँकेचा गौरव
- जिल्हास्तरीय वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीत जी. एम. शिंदे यांचा सन्मान कोल्हापूर, २७ जून (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) ही वार्षिक पतपुरवठा आराखडा, पीक कर्ज वाटप तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सातत्यान
कोल्हापूर जिल्हा वार्षिक पतपुरवठा आढावा


- जिल्हास्तरीय वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीत जी. एम. शिंदे यांचा सन्मान

कोल्हापूर, २७ जून (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) ही वार्षिक पतपुरवठा आराखडा, पीक कर्ज वाटप तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल जिल्हास्तरीय वार्षिक पतपुरवठा आढावा बैठकीत बँकेचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांना तिन्ही विभागांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत केडीसीसी बँकेच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पीक कर्ज वाटपासाठी बँकेला २,४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत तब्बल २,५६४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. त्यामुळे बँकेने १०५ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश संपादन केले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, या योजनेत केडीसीसी बँकेनेही जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. या उपक्रमांतर्गत ८१७ लाभार्थ्यांना सुमारे ११ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले असून, या कामगिरीमुळे बँकेने राज्यात उच्चांक नोंदविला आहे.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंडके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंधळे, आरसेटीचे संचालक प्रशांत कापूरकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, महामंडळांचे प्रतिनिधी आणि बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.-------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande