कर्जमाफीसाठी आधार व ऍग्रिस्टॅक आयडी अनिवार्य
अमरावती, 26 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ऍग्रिस्टॅ आयडी अनिवार्य करण्यात आला असून ही माहिती संबंधित बँक किंवा सेवा सहकारी संस्थेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या
कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक आयडी अनिवार्य बँका व सेवा सहकारी संस्थांकडे माहिती सादर करण्याचे निर्देश


अमरावती, 26 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ऍग्रिस्टॅ आयडी अनिवार्य करण्यात आला असून ही माहिती संबंधित बँक किंवा सेवा सहकारी संस्थेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार व ऍग्रिस्टॅक नोंदणीची माहिती संबंधित बँकेला सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम योजनेअंतर्गत माफ करण्यात येणार आहे. दोन लाख रुपयपिक्षा अधिक चकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम प्रथम भरल्यानंतरच त्यांना एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या लाभासाठी पात्रता मिळणार आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना एकत्रित थकबाकीवर ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षपिकी कोणत्याही दोन वर्षांत पीककर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभमिळणार आहे. पीककर्जाची रक्कम ५० हजार रुपयपिक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान पाच हजार रुपयांचा लाभदेण्यात येणार आहे.ज्यांची अद्याप पोस्टक नोंदणी झालेली नाही त्यांनी ती ताने पूर्ण करून आवश्यक माहिती संबंधित बैंक शाखा किंवा सेवा सहकारी संस्थेकडे जमा करावी, असे ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

दोन लाखापर्यंत कर्जमाफीयोजनेत शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बँकांकडून दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान उचल केलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकित असलेल्या आणि दि. ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व थकित पीककर्ज, पुनर्गठन, फेरपुनर्गठन थकबाकीचे मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रु.२ लाखापर्यंत लाभदेण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande