
छत्रपती संभाजीनगर, 26 जून (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत माता रमाई घरकुल योजनेवरील बैठकीत शहराच्या नावाच्या मुद्द्यावरून भाजप आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या प्रश्नाच्या संदर्भात मोठा गदारोळ उठत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी छत्रपती संभाजी नगर महापालिका असाच उल्लेख करावा असा आग्रह धरला आहे. औरंगाबाद विरुद्ध छत्रपती संभाजीनगर या वादामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला. समाजकल्याण सभापती जालिंदर शेंडगे यांनी बैठक स्थगित केली. दरम्यान, काही सदस्यांनी शहराच्या नावाच्या वादाऐवजी विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची भूमिका मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis