परभणीत २८ जून रोजी चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे होणार उद्घाटन
परभणी, 26 जून (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (MoFPI), नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CI
परभणीत २८ जून रोजी चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे होणार उद्घाटन


परभणी, 26 जून (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (MoFPI), नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CIC) चे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नामदार चिराग पासवान यांच्या हस्ते रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात अन्नतंत्र महाविद्यालय परिसरात कॉमन इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाने होईल. त्यानंतर विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक कॉमन इन्क्युबेशन सेंटर अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संशोधन, नवउद्योजकता, कौशल्य विकास आणि मूल्यवर्धित उत्पादनांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, संशोधक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande