बीड जिल्ह्यात ११ लाख शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारला
बीड, 26 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये तब्बल ११ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा भरला होता. मात्र, जिल्ह्यात पिकांची उत्पादकता जास्त आली असून उंबरठा उत्पन्न वाढले असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत आयसीआयसीआय लोम्बार्ड
पिडीत शेतकऱ्याचे प्रतिकात्मक रेखाचित्र


बीड, 26 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये तब्बल ११ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा भरला होता. मात्र, जिल्ह्यात पिकांची उत्पादकता जास्त आली असून उंबरठा उत्पन्न वाढले असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षीचा पीक विमा सरसकट नाकारला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भीषण अतिवृष्टी झाली होती, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. खुद्द सरकारने या नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची मदत दिली होती, तसेच अंतिम पैसेवारीही कमी आली होती. असे असतानाही केवळ पीक कापणी प्रयोगाच्या (क्रॉप कटिंग) निकषाचा आधार घेत विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास नकार दिला आहे. विमा कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामासाठी तब्बल ६४.३९ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरणारे शेतकरी आता पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे सन २०२० मध्येही अशाच प्रकारे ७२ तासांत विमा कंपनीला इंटिमेशन न दिल्याचे कारण सांगत ४ लाख शेतकऱ्यांचा विमा नाकारण्यात आला होता, ज्याची पुनरावृत्ती आता ५ वर्षांनी पुन्हा झाली आहे. प्रशासकीय पातळीवर नुकसान मान्य होऊनही तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवून शेतकऱ्यांचे हक्क नाकारणाऱ्या विमा कंपन्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande