छ. संभाजीनगर - बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ७.५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी
छत्रपती संभाजीनगर, 26 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना रस्ते योजने अंतर्गत बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ७.५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेतपाणंद रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असून शेतकऱ्
Q


छत्रपती संभाजीनगर, 26 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना रस्ते योजने अंतर्गत बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ७.५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

या निधीमुळे शेतपाणंद रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक, शेतीची कामे आणि बाजारपेठेशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दर्जेदार रस्ते पोहोचल्यास उत्पादन खर्च कमी होतो, वेळेची बचत होते आणि शेतमाल योग्य वेळी बाजारात पोहोचवणे शक्य होते. याच दृष्टीने हा निधी ग्रामीण विकासाला नवी गती देणारा ठरणार आहे.

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सातत्याने काम करत आहे. या निधीमुळे बदनापुर मतदारसंघातील अनेक गावांमधील शेतकरी बांधवांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम होतील आणि शेती विकासाला नवे बळ मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande