अमरावतीतील राजापेठ-बडनेरा रोडवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी
अमरावती, 26 जून (हिं.स.) | अमरावती शहरातील समर्थ महाविद्यालयाजवळील राजापेठ-बडनेरा रोडवर शुक्रवारी पहाटे सुमारे 5.45 वाजता झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे
समर्थ महाविद्यालयाजवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एकाची मृत्यूशी झुंज


अमरावती, 26 जून (हिं.स.) | अमरावती शहरातील समर्थ महाविद्यालयाजवळील राजापेठ-बडनेरा रोडवर शुक्रवारी पहाटे सुमारे 5.45 वाजता झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाची ओळख स्वमील उर्फ गोलू सारंगधर पाटील (वय 28, रा. मालखेड, ता. चांदूर रेल्वे) अशी झाली आहे. अपघातात त्यांच्यासोबत असलेले अभिषेक शंकर वानखडे (वय 24, रा. गोपाल नगर, अमरावती) गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, MH-27 BX-7570 क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीचा चुराडा झाला आणि स्वमील पाटील यांचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बोलेरो पिकअपचा चालक निखिल निर्मल कुशवाह (वय 19, रा. सातूर्णा डीपीएस रोड, क्रांती कॉलनी, अमरावती) याला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पंचनामा करण्यात आला आहे. जखमी अभिषेक वानखडे यांच्या जबाबानंतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे राजापेठ-बडनेरा रोड परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande