पुढील आठ दिवसांत जालना शहरातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरळीत होण्याचे आश्वासन
जालना, 26 जून (हिं.स.)। प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, महावितरण प्रशासनाने शहरातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून पुढील आठ दिवसांत जालना शहरातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरळीत होईल, असे
पुढील आठ दिवसांत जालना शहरातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरळीत होण्याचे आश्वासन


जालना, 26 जून (हिं.स.)।

प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, महावितरण प्रशासनाने शहरातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून पुढील आठ दिवसांत जालना शहरातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरळीत होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून कामाच्या प्रगतीवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि जालना शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने ठोस कृती आराखड्यानुसार काम करावे, अशी अपेक्षाही आमदार खोतकर यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande