सुहास शिरसाठ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट
छत्रपती संभाजीनगर, 26 जून, (हिं.स.) महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री. सुहास
Q


छत्रपती संभाजीनगर, 26 जून, (हिं.स.) महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री. सुहास शिरसाठ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुहास शिरसाठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवत विकासाभिमुख कार्यातून छत्रपती संभाजीनगर–जालना मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. श्री. अतुलजी सावे व मा आमदार कैलास गोरंट्याल होते या भेटीदरम्यान मतदारसंघाच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande