निदा खानच्या जामिनावरील ३० जूनला सुनावणी
नाशिक, 26 जून (हिं.स.)। : टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता ३० जून रोजी होणार आहे. नाशिकरोड येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्य
निदा खानच्या जामिनावरील ३० जूनला सुनावणी


नाशिक, 26 जून (हिं.स.)।

: टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता ३० जून रोजी होणार आहे.

नाशिकरोड येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख ३० जून निश्चित केली. त्यामुळे निदा खानला सध्या तरी दिलासा मिळालेला नसून, तिला आणखी काही दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाकडून जामीन मंजूर होतो की अर्ज फेटाळला जातो,

याबाबतची उत्सुकता कायम आहे. या गुन्ह्यात अश्विनी चेनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, रझा रफीक मेमन यांच्यासह निदा खान यांना आरोपी करण्यात आले असून, संबंधित आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. गुन्ह्यात आतापर्यंत नऊ दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली असून, तपासातील पुरावे आणि साक्षींच्या आधारे पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ३० जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे पीडित पक्ष, आरोपी तसेच कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande