
पुणे, 26 जून (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि
प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, प्रा. (डॉ.) धनंजय मंडलिक, प्रा. (डॉ.) सदानंद बनसोडे, प्रा (डॉ) रावसाहेब लटपटे, शिक्षणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.(डॉ) विलास आढाव, तसेच विद्यापीठ विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु