
बीड, 26 जून (हिं.स.)। किल्ले धारूर येथे राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त जयंती उत्सव समिती चे वतीने प़चायत समिती समोरील चौकात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष बालासाहेब जाधव यांचे हस्ते करण्यात आले. प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे उपनगराध्यक्ष सय्यद शाकेर नगरसेवक बिभिषण गायकवाड संजय फावडे अँड मोहन भोसले, जय़ती उत्सव समितीचे स़स्थापक बंडोबा सांवत बलभिम मुंडे शरद सांवत राजू मोरे ग्रामविकास अधिकारी विजय गायसमुद्रे अमर नेहरकर सुरेश अंडील आदी सह उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis