नाशिक - विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहू महाराजांना अभिवादन
नाशिक, 26 जून (हिं.स.)।महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्
Salute to Shahu Maharaj


नाशिक, 26 जून (हिं.स.)।महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी राजर्षी शाहू महाराज व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कार्यकारी अभियंते योगेश निकम, चेतन वाडे, गोपाल पाटील, नंदकिशोर काळे, जगदीश जाधव, अनिल झटकारे आणि विजय तिवारी यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रेरणादायी- नांदगावकर नाशिक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची प्रभावी पायाभरणी केली. समाजातील मागासवर्गीय, दुर्बल, दिव्यांग, वृद्ध, निराधार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले लोकहितकारी निर्णय व त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि सामाजिक न्यायाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने २६ जून हा त्यांचा जन्मदिवस राज्यात ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक देवीदास नांदगावकर यांनी केले.

समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त माधव वाघ, एच.पी.टी महाविद्यालय नाशिक चे प्राध्यापक डॉ. रामदास भोंग, लेखधिकारी सागर संत, विषेश अधिकारी (शा.नि.शा) नवनाथ डोंगरे, सहाय्यक लेखाधिकारी पुनम बेंडकुळे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्री. देवीदास नांदगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. भोंग यांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनकार्य’ या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील लाभार्थी व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने उपलब्ध करून देण्याच्या योजनेतील लाभार्थी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande