लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख होणार बंधनकारक
बालविवाहांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय बीड, 26 जून (हिं.स.)। बालविवाहाची कुप्रथा कायमची मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार आता एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना पायब
लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख होणार बंधनकारक


बालविवाहांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय

बीड, 26 जून (हिं.स.)। बालविवाहाची कुप्रथा कायमची मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार आता एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे लवकरच कायदेशीररित्या बंधनकारक केले जाणार आहे.

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. या नियमामुळे लग्नापूर्वीच वयाची पडताळणी करणे सुलभ होईल आणि निष्पाप मुलींचे बालपण उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. समाजातील या गंभीर समस्येवर प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून, यामुळे सामाजिक परिवर्तनाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande