
लातूर, 26 जून (हिं.स.)।
राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर येथे समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हिरवी झेंडी दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis