
नाशिक, 26 जून (हिं.स.)। भारतातील आघाडीची स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने नाशिक येथे आपल्या पहिल्या विभागीय (झोनल) कार्यालयाचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील वेगाने विकसित होत असलेल्या टियर-२ आरोग्य विमा बाजारपेठांपैकी एक असलेल्या नाशिकमधील कंपनीच्या विस्ताराला यामुळे बळ मिळाले आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्सचे बिझनेस हेड विजय अरोरा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले.
मुंबई नाका येथील श्री कालिका प्लाझामधील ५,००० चौ. फूट क्षेत्रफळाच्या या कार्यालयात १५० हून अधिक व्यक्तींसाठी क्षमता असून ९,००० पेक्षा अधिक सल्लागारांसाठी प्रशिक्षण व परिषद सुविधा उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये आता स्टार हेल्थची ४ कार्यालये, १ विमा केंद्र आणि ९,००० हून अधिक सल्लागारांचे नेटवर्क कार्यरत आहे.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे पूर्णवेळ संचालक श्री. हिमांशु वालिया म्हणाले, “नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या टियर-२ आरोग्य विमा बाजारांपैकी एक आहे. येथील पहिले झोनल कार्यालय ग्राहक, रुग्णालये, सल्लागार आणि समुदायांच्या अधिक जवळ राहण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV