राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये अभिवादन; विविध संघटनांकडून पुष्पहार अर्पण
लातूर, 26 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचे पुरस्कर्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध
राजर्षी शाहू महाराज


लातूर, 26 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचे पुरस्कर्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहून शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन केले.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टीतून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षण, नोकरी व सन्मानाचे हक्क मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले. भारतातील आरक्षण धोरणाची पायाभरणी करून त्यांनी सामाजिक समतेचा नवा अध्याय लिहिला. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याच्या विचारातून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.

जात, धर्म, पंथ आणि वर्ण यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ही चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेली.

यावेळी शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक नवनाथभाऊ आल्टे, सुरेखाताई पाटील, लालाभाऊ सुरवसे, विशाल आवडे, अकबर शेख, सोहम गायकवाड, राजकिरण सूर्यवंशी, बालाप्रसाद सोमाणी, संतोष उपाडे, यशपाल कांबळे, दयानंद कांबळे, देडे सर, राजकुमार सर, वैजनाथ काळे, मस्के सर, राजेश खटके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande